

England ODI Team
Sakal
England vs Australia 2nd ODI: इंग्लंडचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण दुसऱ्या सामन्यात रविवारी इंग्लंडने पलटवार करत ऑस्ट्रेलियाला ऍडलेडमध्ये १३५ धावांनी पराभूत केले.
गस ऍटकिन्सनसह (Gus Atkinson) इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या विजयामुळे इंग्लंडने वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता तिसरा सामना निर्णायक असेल.