Booster dose third dose sakal
देश

दिल्ली सरकारची मोठी घोषणा! सरकारी केंद्रांवर फ्री मिळणार बूस्टर डोस

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी दिल्ली सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, सरकारकडून कोरोना व्हायरस लसीचा बूस्टर (Booster) डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत दिला जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे.

दिल्ली सरकारने लेखी आदेश जारी करत 18-59 वर्षे वयोगटातील सर्व लोकांना, ज्यांना 9 महिन्यांपूर्वी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे, त्यांना आता सर्व सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये बूस्टर डोस मोफत मिळू शकेल. केंद्र सरकारच्या आदेशानुसार बूस्टर डोस फक्त खाजगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असणार आहे आणि त्यासाठी लस घेणाऱ्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतील.

दिल्लीत बुधवारी कोरोनाची 1009 प्रकरणे नोंदली गेली आहेत मागील एका आठवड्यापेक्षा कमी काळआधी ही संख्या सुमारे 100 इतकी होती. त्यासोबतच सरकारने पुन्हा मास्क अनिवार्य करत मास्कवरील दंड काढून टाकण्याचा आदेश याआधीच मागे घेतला आहे. तसेच बुधवारी एका आदेशाद्वारे मास्क न वापरणाऱ्यांना 500 दंड पुन्हा लावण्यात आला आहे

दिल्ली सरकारने सांगितले की बुस्टर डोस लवकरच सरकारी रुग्णालयांमध्ये लोकांना मोफत दिले जातील. सध्या, Covishield आणि Covaxin या दोन्ही डोसची किंमत 225 रुपये आहे आणि खाजगी लसीकरण केंद्रे जास्तीत जास्त 150 रुपयांपर्यंत सेवा शुल्क म्हणून प्रति डोस आकारू शकतात. केंद्राने रविवारी खाजगी केंद्रांवर 18 वर्षांवरील सर्व लोकांसाठी कोविड लसींचा बुस्टर डोस आणला. दुसऱ्या डोस घेतल्यानंतर ज्यांनी नऊ महिने पूर्ण केले आहेत ते या बुस्टर डोससाठी पात्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

SCROLL FOR NEXT