a boy Sujith dies in bower well at tiruchirapalli after 80 hours
a boy Sujith dies in bower well at tiruchirapalli after 80 hours 
देश

#RIPSujith बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजिथची झुंज अपयशी; 80 तासांनंतर मृत्यूमुखी

वृत्तसंस्था

तिरूचिरापल्ली : तमिळानाडूतील तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील नदुकाटुपट्टी येथे 2 वर्षीय सुजिथ विल्सन शुक्रवारी (ता. 25) बोअरवेलमध्ये पडला होता. परिस्थितीशी झुंज देऊन तब्बल तीन दिवसांनंतर त्याने काल (ता. 28) रात्री अखेरचा श्वास घेतला. 80 तासांच्या बचावकार्यानंतरही सुजिथ वाचू शकला नाही, 2 वर्षीय चिमुकल्याचा करूण अंत झाला. त्याला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर तो मृत असल्याचे समजले.    

देशभरातून सुजिथ विल्सन सुखरूप बाहेर पडावा यासाठी प्रार्थना केली जात होती. 25 ऑक्टोबरला संध्याकाळी घराबाहेर खेळताना तो बोअरवेलमध्ये पडला. 25 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये सुजिथ पडला होता. सुरवातीला तो 30 मिटर खोलीवर अडकला होता. पण खाली सरकत सरकत तो आता 70 मिटर खोल बोअरवेलमध्ये अडकला. सुजित पडल्याची माहिती मिळताच बचावपथके घटनास्थळी दाखल झाली. त्याला समांतर खड्डा खोदून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या खड्ड्यातून शेजारील बोअरवेलमधून सुजिथला काढण्याचे बचावपथकाचे नियोजन करण्यात आले होते. 

त्याला जेव्हा काल रात्री बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याचे शरिर कुजलेल्या अवस्थेत होते. त्याला बाहेर काढेपर्यंत तो मृत्युमुखी पडला होता. तो ज्या बोअरवेलमध्ये पडला तिथेही कुजलेला वास पसरला होता. बाहेर काढल्यानंतर सुजिथला सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले, असे दळवळवण विभागाचे सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींपासून सर्वांनी सुजिथचा जीव वाचावा यासाठी प्रार्थना केली होती. सारा देश त्याच्या बचावासाठी झटत होता, पण अखेर सुजिथचा मृत्यू झाला. ट्विटरवर #RIPSujith हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. सोशल मीडियावर सुजिथच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT