Indian Army Video Esakal
देश

Indian Army Video: भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी वाचवले 500 जणांचे प्राण; थरारक व्हिडिओ समोर

Indian Army Video: बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 500 हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका करण्यात आली. लष्कराने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Indian Army Video: भारतीय लष्कर प्रत्येक वेळी आपली ताकद सिद्ध करताना दिसतात. देशाला शत्रूंपासून वाचवायचे असो किंवा देशवासीयांना संकटातून सोडवायचे असो, सेना नेहमीच आघाडीवर असते. असाच आणखी एक पराक्रम या शूर जवानांनी केला आणि त्यांनी आपला जीव धोक्यात घालून बर्फात अडकलेल्या ५०० लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे.(bravery of indian army saved 500 people from the jaws of death video nathu la himalaya trishakti corps)

प्रकरण आहे सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील नाथुला येथील. मुसळधार बर्फवृष्टीमुळे येथे अडकलेल्या 500 हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका करण्यात आली. लष्कराने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. निवेदनानुसार, पूर्व सिक्कीममध्ये अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 500 हून अधिक पर्यटकांची लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी सुटका केली.

निवेदान म्हटले आहे की, त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांना तेथे बचावासाठी पाठवण्यात आले आणि अडकलेल्या पर्यटकांना मदत केली. पर्यटकांना गरम अन्न आणि त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यांना सुरक्षित वाहतूक प्रदान करण्यात आली. त्रिशक्ती कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर संबंधित काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत.

या पोस्टमध्ये लिहिले, 'अचानक सुरू झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे नाथुलामध्ये 500 हून अधिक पर्यटकांना घेऊन जाणारी सुमारे 175 वाहने अडकली. 'त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान शून्य तापमानात घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. तत्काळ औषध, गरम अन्न आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. हिमालयातील सीमेचे रक्षण करणारी त्रिशक्ती कॉर्प्स पर्यटकांना आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT