Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

Jammu & Kashmir tourism boost: उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आदेश; जाणून घ्या, कोणत्या ठिकाणांचा आहे समावेश?
Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

esakal

Updated on

Pahalgam latest update: जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी १४ पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही पर्यटनस्थळ बंद करण्यात आली होती. ही पर्यटन स्थळे पुन्हा सुरू केल्याने केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन उपक्रमांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपराज्यपाल प्रशासनाने जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे ५० पर्यटन स्थळे बंद केली होती. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते.

याबाबत माहिती देताना उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये म्हटले की, "सखोल सुरक्षा आढावा आणि विचारविनिमयानंतर, मी काश्मीर आणि जम्मू विभागातील अधिक पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत जी खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती बंद करण्यात आली होती."

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!
Betel Leaf : पान खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढते का? जाणून घ्या, तज्ञांचे मत!

यासह, तात्पुरत्या बंदीनंतर पुन्हा उघडलेल्या पर्यटन स्थळांची एकूण संख्या २६ झाली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी उपराज्यपालांनी १२ पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com