Bribe On EMI Esakal
देश

Bribe On EMI: हेच पाहायचे राहिलं होतं! 'EMI'वर लाच घेणाऱ्या पोलिसाला दणका, पहिला हप्ता घेताना पकडले रंगेहात

Police Bribery: देशभरात सराकारी अधिकारी, पोलीस विविध प्रकारे पैसे आणि वस्तूच्या स्वरूपात लाच घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

आशुतोष मसगौंडे

देशभरात सराकारी अधिकारी, पोलीस विविध प्रकारे पैसे आणि वस्तूच्या स्वरूपात लाच घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

मात्र, आता उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथिल बरेलीमध्ये एका प्रकरणातून नाव काढून टाकण्याच्या बदल्यात एका निरीक्षकाने दोन जणांकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली.

जेव्हा या दोघांनी इतकी रक्कम देण्यास नकार दिला तेव्हा निरीक्षकाने त्यांना लाचेची रक्कम ईएमआयमध्ये देण्याचा पर्याय दिला.

यानंतर या दोन्ही व्यक्तींनी दक्षता विभागाकडे तक्रार केली. आणि त्यानंतर लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना दक्षता पथकाने निरीक्षकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामौतर यांनी किला पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एक महिला आणि आणखी एका आरोपीला बाहेर काढण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती.

यावर या प्रकरणातील तक्रारदारांनी एवढी मोठी रक्कम एकाच वेळी देणे शक्य नसल्याचे सांगितले. यानंतर पोलीस निरीक्षकाने त्यांना रक्कम हप्त्यामध्ये देण्याची विनंती केली. आणि सर्व रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये देण्याचे ठेरले. यानंतर तक्रारदारांनी पोलीस अधिक्षक दक्षता कार्यांलयाकडे लेखी तक्रार केली.

तपासात आरोपांची खात्री झाल्यानंतर दक्षता पथकाने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये घेणाऱ्या निरीक्षकाला कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकत्या येथे रंगेहाथ पकडले.

आरोपी इन्स्पेक्टर रामौतर हा नरियावाल येथील घरात भाड्याने राहतो. पोलीस अधिक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले की, निरीक्षकाने लाचेची रक्कम हप्त्यात देण्यास सांगितले होते. पीडितांनी तक्रार केल्यावर पथकाने नरीक्षकाला जागेवर पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : शेवटी मी धाडस केलं! अरिजीत सिंहने सांगितलं निवृत्तीचं कारण, म्हणाला, मी जगू शकेन

Latest Marathi News Live Update : अमृता फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये; अंजली भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Pune News: पुणे विमानतळ ‘एएसक्यू’ सर्वेक्षणात पहिले; पाचपैकी मिळवले ४.९६ गुण, सेवेच्या दर्जात सातत्याने वाढ!

Mumbai : स्कूलबसने चिरडल्यानं एक वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; नातीला आणायला गेल्यावर अपघात, घटना CCTVमध्ये कैद

Mumbai News: राज्यातील आयटीआय कात टाकणार! राज्य मंत्रिमंडळ बैठक, ‘पीएम सेतू योजने’अंतर्गत आधुनिकीकरण होणार..

SCROLL FOR NEXT