

Aaqib Javed Compares Jasprit Bumrah to Usman Tariq
Sakal
Aaqib Javed Compares Jasprit Bumrah to Usman Tariq: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सुपर-८ मध्येच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यांना या स्पर्धेत भारताविरुद्ध पराभवाचाही सामना करावा लागला होता. या स्पर्धेदरम्यान उस्मान तारीकचीही बरीच चर्चा झाली.
वेगवान गोलंदाज असलेल्या उस्मान तारीक (Usman Tariq) थांबून गोलंदाजी करत असल्याने आणि काहीशी चेंडू फेकण्यासारखी त्याची शैली असल्याने अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले होते.
पण त्याला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्याने १० विकेट्स घेतल्या. मात्र असं असलं तरी पाकिस्तानचे निवड समिती सदस्य आकिब जावेद (Aaqib Javed) यांनी त्याची तुलना थेट भारताचा दिग्गज क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) केली आहे. इतकेच नाही, तर भारताविरुद्धच्या पराभवालाही त्यांनी पाठीशी घातलं आहे.