Pool collapses in Kolkata Many people might be in that
Pool collapses in Kolkata Many people might be in that 
देश

कोलकात्यात पूल कोसळला ; अनेकजण दबल्याची भीती

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे सुमारे 40 वर्षे जुना माजेरहाट पूल कोसळल्याची घटना आज (मंगळवार) घडली. हा पूल बेहाला-इकबालनगरला जोडला जात होता. या पुलाचा एक भाग कोसळला असून, या पुलाखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पुलाखाली अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या होत्या. यामधील अनेक गाड्या ढिगाऱ्याखालील दबल्या गेल्या आहेत. तसेच यामध्ये अनेकजण अडकल्याची भीती आहे. या दुर्घटनेतील बाधितांचा वाचविण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यातील सहा जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून, या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले, की बचावकार्य संपले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले, की पोलिसांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल. मात्र, सध्या आमचे लक्ष फक्त बचावकार्यावर आहे. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही चिंतेत असून, बचाव पथकाकडून आम्ही प्रत्येक बाबींची माहिती घेत आहोत''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT