Mayawati nomination as the prime ministerial candidate
Mayawati nomination as the prime ministerial candidate  
देश

इंडिया आघाडीला मोठी संधी; बसपची फक्त एक अट मान्य केली तर मायावती येणार सोबत!

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. पण, त्यांचा मार्ग खडतर असल्याचं दिसत आहे. इंडिया आघाडीत येऊ इच्छिणाऱ्या सर्व पक्षांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नेत्यांना करावा लागत आहे. त्यातच बसपकडून इंडिया आघाडीकडे एक अट ठेवण्यात आली आहे. (BSP demanded Mayawati nomination as the prime ministerial candidate in the 2024 Lok Sabha elections INDIA bloc knp)

बहुजन समाज पक्षाने इंडिया आघाडीत यावे असं वाटत असेल तर सुप्रिमो मायावती यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवा अशी मागणी बसप खासदार मलूक नागर यांनी केली आहे. ते एका हिंदी वृत्त वाहिनीला बोलत होते. त्यांची ही मागणी इंडिया आघाडीतील नेते कशाप्रकारे घेतात हे पाहावं लागेल.

बसपने इंडिया आघाडीत येण्यासाठी ही अट ठेवल्याचं मानलं जात आहे. मलूक नागर पुढे म्हणाले की, काँग्रेसने काही आमदार पळवल्याप्रकरणी मायावती यांची माफी मागावी. तसेच मायावतींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. असं केलं तरच इंडिया आघाडी २०२४ मध्ये भाजपला रोखू शकेल.

काँग्रेसला पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा पाहिजे असेल तर मायावती यांच्यासारखा चांगला पर्याय असू शकत नाही. काँग्रेसने ही अट मान्य केली तर मायवती नक्कीच इंडिया आघाडीत येण्याचा सकारात्मक विचार करतील, असं ते म्हणाले आहेत. बसप सध्या इंडिया आघाडी आणि एनडीएपासून दूर राहण्याचे धोरण अवलंबत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आमच्याकडे १३.५ टक्के मतदार आहेत. त्यामुळे निकाल फिरवण्याची आमच्यात ताकद आहे. मायावतींना पंतप्रधान पदाचा चेहरा करण्यात आला तर उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला ६० पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असंही नागर म्हणाले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे मायावतींना इंडिया आघाडीत घेण्यासाठी नाखूष असल्याची माहिती चूक आहे, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT