up election 2022 mayawati bsp  Sakal Digital
देश

बसपाचा हत्ती एकाच जागी! सुमार कामगिरीवर मायावती म्हणतात, 'आमच्यासाठी हा...'

सकाळ डिजिटल टीम

यूपी निवडणुकीचा निकाल काल लागला आहे. 403 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत प्राप्त झालं आहे. मात्र, समाजवादी पार्टीने भाजपला टक्कर देत त्यांच्या जागा कमी केल्या आहेत. मात्र, एकेकाळी यूपीची सत्ता काबीज करणाऱ्या मायवतींचा हत्ती मात्र, सुरुवातीपासूनच्या प्रचारातही रोडावलेला दिसला. त्याचे परिणाम मतमोजणीतील आकड्यांमध्ये स्पष्ट दिसून आले. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला अवघी एक जागा मिळाल्या आहेत. या साऱ्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी कालही मायावती माध्यमांसमोर आल्या नव्हत्या. (BSP chief Mayawati)

मात्र, त्यांनी आज त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, यूपी निवडणुकीचे निकाल बसपाच्या अपेक्षेच्या विरोधात जाणारे आहेत. मात्र, त्यामुळे आम्ही निराश होणार नाही. त्याऐवजी, आम्ही त्यातून धडा घेतला पाहिजे, आत्मपरीक्षण केले पाहिजे. तसेच आपल्या पक्षाची चळवळ पुढे नेत पुन्हा सत्तेत आलं पाहिजे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात भाजपच्या फारशा जागा नव्हत्या. त्याचप्रमाणे आज काँग्रेसही भाजपच्याच टप्प्यातून जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल हा आपल्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा धडा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT