Nitish Kumar sakal
देश

Lok Sabha Election : मायावतींचा ‘इंडिया’ला खो! उत्तर प्रदेशात लोकसभा स्वबळावर लढण्याची घोषणा

मायावतींनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा केल्याने त्यांना इंडिया आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांना ‘इंडिया’ आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांना खो मिळाला आहे. मायावतींनी उत्तर प्रदेशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली.

काही दिवसांपूर्वी बसपचे खासदार दानिश अली यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पाटणा येथे भेट घेतली होती. मायावतींनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा केल्याने त्यांना इंडिया आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रवेशामुळे विरोधकांच्या आघाडीला बळ मिळेल, असे मानले जात होते. पण मायावतींच्या या भूमिकेने इंडिया आघाडीच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे.

बसपचे लोकसभेत १० खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील जाटव या अनुसूचित जातीच्या समाजावर बसपचा प्रभाव आहे. आता इंडिया आघाडीतील सप, काँग्रेस व रालोद या घटक पक्षांना उत्तर प्रदेशात भाजपसोबत व बसपचाही सामना करावा लागणार आहे.

विरोधकांच्या आघाडीत बसप सामील व्हावे, अशी मागणी करणाऱ्या बसपच्या नेत्याला मायावतींनी घरचा रस्ता दाखविला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांवर प्रभाव असलेल्या इमरान मसूद यांनी बसपने इंडिया आघाडीत सामील होण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

मायावती इंडिया आघाडीत सामील न झाल्यास बसपला एकही जागा मिळणार नाही, असे भाकीतही वर्तविले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी इमरान मसूद यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT