Budgam encounter Two terrorists killed by security forces in Jammu and Kashmir
Budgam encounter Two terrorists killed by security forces in Jammu and Kashmir 
देश

जम्मू काश्मीरमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था

जम्मू : जम्मू काश्मीरच्या बडगाव जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ही चकमक आज (गुरुवार) झगू अरिझल परिसरात घडली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

बडगाव जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरु होती. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या प्रत्युत्तरादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या चकमकीनंतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तसेच या मीडियाच्या आऊटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅनचे (ओबी) यामध्ये मोठे नुकसान झाले.

याबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले, की या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

''आम्ही या संघटनेला काही काळासाठी ट्रॅकिंगवर ठेवले होते. आगामी पंचायत निवडणुकीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाण्याची शक्यता होती'', अशी माहिती कर्नल ए. के. नायर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT