Budget 2024 Esakal
देश

Budget 2024 Railway: 40 हजार रेल्वे बोगी 'वंदे भारत'मध्ये बदलणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

40 thousand railway coaches will be converted into 'Vande Bharat' : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात रेल्वेला एक अद्भुत भेट मिळाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात रेल्वेला एक अद्भुत भेट मिळाली आहे. आज (गुरुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत 3 नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जातील. हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील.

या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल. 40 हजार सामान्य रेल्वे बोगी वंदे भारतमध्ये रूपांतरित केल्या जातील अशी घोषणा यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

गेल्या वर्षी रेल्वेला किती वाटा मिळाला होता?

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने रेल्वेवर सर्वाधिक भर दिला होता. 2023 च्या एकूण 45 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रेल्वेचा वाटा 2.4 लाख कोटी रुपये होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद सातत्याने वाढली आहे.

5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 च्या अर्थसंकल्पात रेल्वेला 69,967 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये रेल्वेला 70,250 कोटी रुपये देण्यात आले. एका वर्षानंतर, म्हणजे 2021 मध्ये, पहिल्यांदाच रेल्वेचा अर्थसंकल्प 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला. तर 2023 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी रेल्वेच्या अर्थसंकल्पीय वाटपाने प्रथमच 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

2017 पासून सामान्य अर्थसंकल्पाचा भाग बनवला

मोदी सरकारच्या आधी रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ही परंपरा 2017 पासून बदलली. रेल्वे अर्थसंकल्प हा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्या वर्षी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा एक भाग होता. त्याआधी रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्र्यांनी स्वतंत्रपणे मांडला होता. आता गेल्या 7 वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पाचा भाग म्हणून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT