PM Modi on Budget
PM Modi on Budget Esakal
देश

PM Modi on Budget: विरोधकांना रामराम म्हणत मोदींनी बजेटबद्दल केला मोठा खुलासा, "नव्या सरकारमध्ये..."

अंकिता खाणे (Ankita Khane)

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील. हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचं पर्व आहे. नवं सरकार पुर्ण अर्थसंकल्प सादर करेल असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. गोंधळ घालणं हा काही लोकांचा स्वभाव असतो. अधिवेशनावेळी गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची ही संधी आहे, गोंधळ घालणाऱ्यांनी एकदा आत्मपरिक्षण करावं असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. बुधवारी (३१ जानेवारी २०२४) सकाळी कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, काही लोक सवयीने गोंधळ घालतात. असा गोंधळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.

भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, २०२४ सालासाठी तुम्हा सर्वांना राम-राम! नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाअंती एक फार मोठा निर्णय (वुमन पॉवर ॲक्ट) घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. उद्या (1 फेब्रुवारी, 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. ही महिला शक्ती आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या गोंधळाच्या वृत्तीचा संदर्भ देत पंतप्रधान पुढे म्हणाले, सर्व खासदारांना आठवणार नाही. टीका धारदार असू शकते पण गदारोळ होता कामा नये. गदारोळ करणाऱ्यांना कोणीही लक्षात ठेवत नाही. आता शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वांना त्यांचे मत मांडण्याची संधी आहे.अशा परिस्थितीत त्यांनी प्रतिष्ठा राखली पाहिजे.काही लोक सवयीने गोंधळ घालतात".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

BJP Big Loss Five States: भाजपची 400 पारची घोषणा ठरली फेल! 'या' पाच राज्यांनी केला गेम

दिल्लीच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत खलबतं! ममतांचा भाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

Sunil Chhetri : एक पर्व संपलं! सुनिल छेत्रीच्या डोळ्यात तरळले अश्रू; सामना राहिला 0-0 बरोबरीत

Patna-Jharkhand Train Fire: पाटणा-झारखंड पॅसेंजरच्या डब्यांना आग, ट्रेनमधून उड्या मारत लोकांनी वाचवला जीव

SCROLL FOR NEXT