nirmala sitharaman sakal
देश

Budget 2023 : आज सादर होणार आर्थिक पाहणी अहवाल; अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात आजपासून सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार असून ते 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातील पहिलंच अधिवेशन आहे. याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभगृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. यानंतर सीतारमण या २०२२-२३ च्या अर्थित सर्वेक्षणाचा अहवाल सादर करतील.

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे. तर मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT