jawan
jawan 
देश

दहशतवाद्यांशी लढताना बुदिहाळचा जवान हुतात्मा 

राजेंद्र हजारे

निपाणी : देशाच्या सीमेवरील जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे  दहशतवाद्यांशी लढताना बुदिहाळ येथील जवान  भोजराज उर्फ प्रकाश पुंडलिक जाधव (वय २८) यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. सोमवारी रात्री अतिरेक्यांशी दोन हात करताना ही घटना घडली आहे. भोजराज यांना वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती मिळताच बुदीहाळसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की बुदिहाळ येथील भोजराज जाधव हे वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी सेवा बजावली होती. काही महिन्यांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील सीमेवर त्यांची बदली झाली होती.  दरम्यान बदलीनंतर दिवाळीपूर्वी एक महिन्याची सुट्टी घेऊन ते बुदिहाळ या आपल्या मूळ गावी आले होते. दिवाळीनंतर ते पुन्हा अनंतनाग येथे रुजू झाले होते. अनंतराय येथे आपली सर्व खुशाली त्यांनी दोन दिवसांपूर्वी कुटुंबातील सदस्यांना कळविली होती.

मंगळवारी रात्री अनंतनाग भागात अतिरेक्यांनी बेछूट गोळीबर केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जाधव यांच्यासह सहकार्यांनी प्रयत्न केला. यावेळी  एक अतिरेकीही ठार झाला. पण दुर्दैवाने भोजराज हे जवान शहीद झाले. याबाबची माहिती त्याच्या कुटुंबियांना बुधवारी ( ता. २७ ) सकाळी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिवाय गावातून शाेक वयक्त केला जात आहे. त्य़ाचप्रमाणे गावातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले. दीड वर्षांपूर्वी शहीद जवान भोजराज यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन महिन्यांची मुलगीही आहे. जवान भोजराज यांच्या मागे आई- वडील भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT