Pit Bull Attacks Boy
Pit Bull Attacks Boy Esakal
देश

Pit Bull Attacks Boy: पाळीव पिटबुलने केला १५ वर्षांच्या मुलावर हल्ला, लोक पाहात राहिले पण रस्त्यावरील कुत्र्यांनी वाचवला जीव, Video Viral

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pit Bull Attacks Boy: भटक्या श्वानांचा (Stray Dogs) सूळसूळाट आणि हल्ले यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रामाणात वाढले असून आता लहान मुलांसह मोठी माणसे देखील अशा श्वानांना बिचकून राहताना दिसत आहेत. तरी अशा श्वानांचा उच्छाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. अशातच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

दिल्लीतील गाझियाबादमध्ये काल (मंगळवारी) एका 15 वर्षीय मुलावर आक्रमक पाळीव पिटबुलने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, मुलाला नंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

सोशल मिडीयावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका कुत्र्याने 15 वर्षांच्या मुलावर हल्ला केला. आश्चर्याची बाब म्हणजे तेथे काही लोक उपस्थित होते जे या मुलाला मदत करू शकले असते, पण ते फक्त समोर कुत्र्याने केलेला हल्ला बघत राहिले.

व्हिडिओमध्ये दिसून येते की, कुत्र्याने मुलावर कसा हल्ला केला आणि त्याला ओरबाडण्यास सुरुवात केली, तर लोक त्याला मदत करण्याऐवजी पाहत होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि काही वेळातच ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली.

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पुढे दिसून येते की, मुलाने स्वतः कुत्र्याला दूर ढकलून, उभे राहून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही कुत्रा त्याच्या मागे लागतो.

दरम्यान, काही भटक्या कुत्र्यांनी पिटबुलवर हल्ला केला आणि यावेळी मुलगा घरात पळून गेला. त्या कुत्र्यांमुळे मोठा अनर्थ टळला. अहवालात म्हटले आहे की, पिटबुलचे मालक नुकतेच गाझियाबादमध्ये राहण्यासाठी गेले होते, तेथील इतर रहिवाशांनी कुत्र्यांच्या धोकादायक जाती न ठेवण्याची विनंती केली होती, परंतु कुटुंबाने त्यांचे ऐकले नाही.

प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, त्यांना इंटरनेटवर या व्हिडिओची माहिती मिळाली आहे, परंतु अद्याप या प्रकरणाशी संबंधित कोणतीही तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही. गाझियाबाद महापालिकेने आक्रमक पिट बुल ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने पिट बुलसह 23 जातीच्या क्रूर कुत्र्यांच्या विक्री आणि प्रजननावर पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. बंदी घातलेल्या कुत्र्यांच्या यादीत अमेरिकन बुलडॉग, रॉटविलर, मास्टिफ्स आणि इतर आक्रमक कुत्र्यांचा समावेश आहे ज्यानंतर अशा आक्रमक जातींच्या हल्ल्याची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT