cds bipin rawat achievements from myanmar mision to the surgical strike in pok Sakal
देश

म्यानमार मिशन ते पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक; रावत यांची कामगिरी

सकाळ डिजिटल टीम

तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात रावत यांच्या सोबत त्यांची पत्नी मधुलिका रावतही यांचाही मृत्यू झाला, त्यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त होत आहे. रावत लष्करात दाखल झाल्यानंतर जनरल रावत यांनी केलेल्या कामगिरीवर आपण एक नजर टाकणार आहोत.

डेहराडूनमध्ये 16 मार्च 1958 रोजी जन्म

सीडीएस बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हे देखील सैन्यात होते आणि लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते, त्यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडूनमध्ये झाला होता. सीडीएस रावत हे सेंट एडवर्ड स्कूल, शिमला आणि नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकसालाचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल पदवी आणि मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्ये डिप्लोमा घेतला होचा. डिसेंबर 1978 मध्ये, त्यांना इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथून 11 गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांना येथे 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' देखील प्रदान करण्यात आला आहे.

जनरल बिपिन रावत यांना उंचीवरील युध्दभूमी आणि बंडखोरीविरोधी कारवायांचे नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव होता. त्यांनी1986 मध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर इन्फंट्री बटालियनचे प्रमुख म्हणून काम केले होते. याशिवाय त्यांनी काश्मीर खोऱ्यातील राष्ट्रीय रायफल्स आणि 19 इन्फंट्री डिव्हिजनच्या सेक्टरचेही नेतृत्व केले. त्यांनी काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचेही नेतृत्व केले.

सीडीएस बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करानेही अनेक कारवाया केल्या आहेत. ईशान्येतील दहशतवाद कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जून 2015 मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. यानंतर 21 पॅरा कमांडोनी सीमा ओलांडून म्यानमारमध्ये NSCN- या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले. तेव्हा 21 पॅरा थर्ड कॉर्प्सच्या अंतर्गत होते ज्यांचे कमांडर बिपिन रावत होते. याशिवाय 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. उरी येथील आर्मी कॅम्प आणि पुलवामा येथील सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले होते.

पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

2019 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या नवीन पदाच्या निर्मितीची घोषणा केली. भारतीय लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर बिपिन रावत यांनी संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आपल्या चार दशकांच्या सेवेत जनरल रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी) सदर्न कमांड, जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 2 मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टरेट, मिलिटरी सेक्रेटरी ब्रँचमध्ये कर्नल मिलिटरी सेक्रेटरी आणि डेप्युटी मिलिटरी सेक्रेटरी आणि ज्युनियर कमांड विंगमध्ये सिनीअर इंस्ट्रक्टर म्हणून काम केले. आजवर त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करणयात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT