देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा पाच राज्यांना इशारा  sakal media
देश

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा पाच राज्यांना इशारा

देशात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सुचना केल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

देशात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सुचना केल्या आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, ओडिशा, मिझोरम सोबत जम्मू - कश्मीर या केंद्रशासित राज्यालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पत्रात राजेश भूषण यांनी पत्रात सांगितले आहे की, या पाच राज्यांत टेस्टींग, ट्रॅकिंग, आणि लसीकरण या उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. तसेच, कोरोनाचा प्रसार आणि मृत्यु रोखण्याबाबात नियमांचे पालन करण्याचाही सुचना त्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहले होते. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी, संसर्गित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे तात्काळ ट्रॅकिंग करुन विलगीकरण करण्याचे निर्देश दिले होते.

मिझोरम

राज्यात ४ डिसेंबर पर्यंत कोरोनाचे १२ हजार ५६२ नवीन रुग्ण आढळले. देशात एक महिन्यात सापडलेल्या रुग्णांपैकी ४.१ टक्के रुग्ण मिझोरम येथील होते.

कर्नाटक

१६ नोव्हेंबर रोजी राज्यात १ हजार ६६४ ती ३ डिसेंबरला वाढुन २ हजार २७२ झाली आहे. तसेच, मृत्युसंख्येत २२ वरुन २९ वाढ झाली आहे.

ओडिशा

एक महिन्यात ओडिशात ७ हजार ४४५ नवे रुग्ण सापडले. देशात आढळणाऱ्या एकूण २.५ टक्के रुग्ण हे ओडिशातील होते.

जम्मू - कश्मीर

३ डिसेंबर पर्यंत जम्मू - कश्मीरात ४ हजार ८०६ नवीन रुग्णांची नोंद झाली. कठुआ, जम्मू, गंदेरबाल आणि बारामूला जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासुन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT