AAP Punjab CM Bhagwant Mann
AAP Punjab CM Bhagwant Mann 
देश

अग्निपथ भरतीला पूर्ण सहकार्य; भगवंत मान

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : ‘केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्करभरती प्रक्रियेला आम्ही पूर्ण पाठिंबा देत सहकार्य करू’ असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुरक्षा दलांना दिल्यानंतर राज्यातील भरतीला चालना मिळण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी स्थानिक प्रशासन आणि अधिकारी यांच्याकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी शिफारस आम्ही लष्कराच्या मुख्यालयाकडे करणार आहोत.

अशी भूमिका बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी घेतली होती. स्थानिक अधिकारी हे राज्य सरकारकडून निर्देश अथवा निधी मिळाला नसल्याचे कारण देत भरतीसाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार लष्कराच्या जालंधर कँटोन्मेंट झोनच्या निवड अधिकाऱ्यांनी पंजाबचे मुख्य सचिव व्ही. के. जांजुआ

आणि मुख्य सचिव (रोजगार) कुमार राहुल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली होती. मान यांनी आज याची गंभीर दखल घेत सर्व उपायुक्तांना लष्कराच्या अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT