लसीकरण केंद्र sakal
देश

केंद्र सरकारकडून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या राज्य सरकाराना सूचना

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना केंद्र सरकारने लसीकरणाचे प्रमाण व विशेषतः शालेय मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना राज्य सरकाराना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यात त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना दिल्या.

देशात कोरोना महामारीच्या रूग्णसंख्येत पुन्हा व दररोज होणारी वाढ चौथ्या लाटेची आशंका घेऊन आली आहे. सध्याची वाढती रूग्णसंख्या चौथी लाट असल्याचे इतक्यात मानता येणार नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले असले तरी केंद्राने राज्य सरकारांना सावधगिरीच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मांडविया यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान राज्य सरकारांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले.

मागील तीन दिवसांत देशात रोज ८ हजारंच्या वर नवीन रूग्ण आढलत आहेत. हे पहाता शालेय मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा त्याचबरोबर प्रौढ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांच्या साठी प्रिकॉशन म्हणजे बूस्टर डोसचीही गती वाढवावी आणि जीनोम सिक्वेन्सिंग प्रणाली मजबूत करण्यावर लक्ष द्यावे अशाही सूचना मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना केल्या. कोरोनाचा धओका अद्याप कमी झालेला नाही. कोवीड नियमांचे पालन करण्यात शिथिलता आणणे धोक्याचे ठरेल असाही त्यांनी इशारा दिला.

देशात कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. मागच्या २४ तासांत ८०८४ नवे रूग्ण आढळले त्यानंतर देशातील सध्याची रूग्णसंख्या ४८ हजारांच्या आसपास पोचली आहे. यात उपार सुरू असलेली रूग्णसंख्या एकूण रूग्णांच्या ०.११ टक्के म्हणजे ४२९९५ झाली आहे. मृतांच्या संख्येतही १० ने वाढ होऊन मृतांचा एकूण सरकारी आकडा ५ लाख २४ हजार ७७१ झाला आहे. या दरम्यान देशातील लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. आतापावेतो १९५ कोटी १९ लाखांहून जास्त लसीकरण झाले आहे. १२ जून २०२२ रोजी एका दिवसात ११ लाख ७७ हजार १४६ लसीकरण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT