isro
isro 
देश

चांद्रयान मोहीम पुढे ढकलली

पीटीआय

चेन्नई - भारताची "चांद्रयान-2' मोहीम येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होणार होती. मात्र, तज्ज्ञांनी आणखी काही चाचण्या सुचविल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवान यांनी दिली. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचा प्रथमच प्रयत्न केला जाणार आहे.

इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग राबवित आहेत. चंद्रावर मानवी वस्तीच्या उद्दिष्टासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे. भारताने याआधी चंद्रावर यान पाठविले आहे. इस्रोकडून आता चांद्रयान-2 प्रकल्पाची तयारी करण्यात येत आहे.

चंद्राच्या कक्षेत (ऑर्बिट) 2020 पर्यंत अवकाश स्थानक बांधण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय पृथ्वीवरुन प्रक्षेपित करण्यात असलेले रेडिओ सिग्नल चंद्राच्या ज्या भागांमध्ये पोहोचू शकत नाहीत, अशा भागांविषयी चीनही संशोधन करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताकडून घेण्यात आलेली ही मोहिम अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT