Chennai Floods
Chennai Floods eSakal
देश

Chennai Floods : चेन्नई अजूनही पाण्यातच; वीजपुरवठाही खंडित

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : मिचाँग चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीतून तमिळनाडूची राजधानी अद्याप सावरलेली नाही. प्रशासनाने मदत व बचावकार्याला गती दिलेली असली तरी जागोजागी साठलेले पाणी, खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा दोन दिवसांनंतरही रहिवाशांना सामना करावा लागत आहे. काही भागांत अजूनही वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला नसून तो सुरळीत करण्याचे प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. शहरातील शाळा तसेच महाविद्यालयांना उद्याही (ता.७) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

चेन्नईच्या वेलाचेरी व तांबारम या उपनगरांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला. येथील लोक जलमय झालेले भाग सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करत असल्याचे चित्र आजही कायम होते. सुटकेसाठी आणखी नौका उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे. शहरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर लोक अडकून पडल्याचा दावा करत अनेक युजर्संनी ‘एक्स’वर केला आहे. सोशल मीडियावर वेलाचेरी हा ट्रेंड होता. चेन्नईच्या अनेक उपनगरात दूध टंचाई असून ते अधिक किमतीला विकले जात असल्याचा दावाही केला जात आहे.

किल्पौक आणि कट्टुपक्कममध्ये वीजपुरवठा दोन दिवसांनंतरही सुरळीत झालेला झालेही. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस नौकांच्या माध्यमातून बचावकार्य राबविले जात आहे. शहरांतील अनेक भागांतील पाणीपुरवठाही सुरळीत करण्यात आल्याचे राज्याचे मुख्य सचिव शिवदास मीना माध्यमांशी बोलताना सांगितले.

चेन्नईतील बचावकार्य

  • एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या सहभागी.

  • शहरांत विविध ठिकाणी ४०० नौकांद्वारे रहिवाशांची सुटका.

  • पूरग्रस्त भागांत दुधासह खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा पुरवठा.

तमिळनाडूची पाच हजार कोटींची मागणी

मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी चेन्नईतील पूरग्रस्त भागांचा दौरा करून लोकांसाठी उभारलेल्या मदत छावण्यांत अन्न तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. शहरात मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी काढण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. तमिळनाडू सरकारने चेन्नईत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी केंद्र सरकारकडे ५,०६० कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. द्रमुक नेते टी.आर बालू यांनी हे पत्र पंतप्रधान मोदी यांना दिले.

चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर ‘मिचाँग’ या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हे क्षेत्र उत्तरेकडे सरकून त्याची तीव्रता आणखी कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या हे क्षेत्र आंध्र प्रदेशचा किनारी भाग, ईशान्य तेलंगण आणि लगतच्या दक्षिण छत्तीसगडवर आहे. या क्षेत्रामुळे आंध्रातील विशाखापट्टणम, विजयनगर, अल्लुरी या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT