बघेल यांनी पचवले चाबकाचे फटके sakal
देश

छत्तीसगडच्या भल्यासाठी बघेल यांनी पचवले चाबकाचे फटके

कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

रायपूर : देशात सध्या सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असून, कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांच्या प्रकाशात सारा देश न्हाऊन निघाला आहे. त्यातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक व्हीडिओ समोर आला असून, त्यामध्ये त्यांना चाबकाने फटके मारले जात असल्याचे दिसत आहे.

देशात अनेक ठिकाणी दिवाळीच्या वेगवेगळ्या मुहूर्तावर विविध प्रथा परंपरांनुसार धार्मिक विधी केले जातात. असाच एक विधी छत्तीसगडमध्ये साजरा केला गेला. त्यानुसार भूपेश बघेल यांच्या हातावर चाबकाने फटके मारण्यात आले. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दिवाळीनंतर साजरा केल्या जाणाऱ्या गोवर्धन पूजेत सहभागी झाले होते. यावेळी गौरा-गौरी उत्सवात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांना गवतापासून बनवलेल्या चाबकाने फटके मारण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. दरम्यान, दरवर्षी परंपरेनुसार मुख्यमंत्री बघेल दरवर्षी राज्याच्या कल्याणाची प्रार्थना करत या कार्यक्रमात सहभागी होतात अशी माहिती राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुर्ग जिल्ह्यातील जंजगिरी गावात त्यांनी ही परंपरा पाळली जाते. त्यानुसार आजच्या या कार्यक्रमात ग्रामस्थ वीरेंद्र ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हातावर हे चाबकाने फटके मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT