CM Bhupesh Baghel
CM Bhupesh Baghel  Sakal
देश

राज्याच्या अर्थसंकल्पासाठी चक्क शेणापासून बनवलेली ब्रीफकेस

सकाळ डिजिटल टीम

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी त्यांनी हातात घेऊन गेलेल्या ब्रीफकेसची चर्चा जोरदार रंगली आहे. बघेल यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वापरलेली बॅग इम्पोर्टेड वगैरे किंवा हिरेजडीत होती आणि त्यामुळे याची एवढी चर्चा झाली असे तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा, कारण बघेल यांच्या हातातील बॅग हिरे, माणिक मोती नव्हे तर, चक्क शेणापासून बनवलेली होती. या बॅगेची निर्मिती महिला बचत गटाने तयार केलेल्या शेणाच्या पावडरपासून बनवण्यात आलेली आहे. (Chhattisgarh CM Bhupesh Baghel Used Special Briefcase For State Budget)

बॅगेवर 'गोमय बस्ते लक्ष्मी' चा संदेश

या बॅगेवर 'गोमय बस्ते लक्ष्मी' असे लिहिलेले असून, छत्तीसगड हे देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायीच्या शेणापासून बनवलेल्या ब्रीफकेसचा वापर करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये शेणापासून अनेक प्रकारची उत्पादने बनवली गेली असून, यामुळे राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले जात आहे.

छत्तीसगढच्या अर्थसंकल्पात नेमकं काय ?

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासोबतच छत्तीसगड रोजगार मिशनमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांच्या समन्वयाने रोजगार निर्मितीच्या शक्यतांवर काम करण्यासाठी दोन कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT