adar poonawalla sakal media
देश

Corona Update : वाढत्या रूग्णसंख्येत अदर पुनावालांचं भारतीयांसाठी मोठं विधान; म्हणाले...

भारताचा शेजारी राष्ट्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adar Poonawala Tweet After Corona Cases Hike In China : भारताचा शेजारी राष्ट्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्शवभूमीवर भारतासह अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

दरम्यान, चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येत कोविशील्ड लस निर्माते अदर पुनावालांनी ट्वीट करत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. परंतु, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.

दरम्यान, काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व कोविड-पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने INSACOG लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले आहे.

कोरोना अद्याप संपलेला नाही

चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि आरोग्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी कोरोना अद्याप संपलेला नाही, असं मोठं विधान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर केलं आहे. यासंदर्भात सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

चीनमधील नव्या व्हेरियंटी चर्चा

दरम्यान, बैठकीबाबत नीती आयोगाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, कोरोनाच्या जागतीक परिस्थितीवर आज केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित चर्चा झाली. कोरोनाच्या बाबतीत आपण सतर्क आहोत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या बैठकीत चीनच्या नवीन व्हेरिअटची चर्चा झाली. भारतातील सर्व रुग्णालातील न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी केली जाईल. यासंदर्भात प्रत्येक आठवड्यात बैठक होईल.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

लक्षणं असतील तर कोरोना टेस्ट करा. ज्यांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला नसेल तर त्यांनी डोस घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहनही आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT