Citizens stranded in Ukraine say the majority of Indians are safe during ukrain Russia war  
देश

युक्रेनमध्ये अडकलेल भारतीय म्हणाले, 'आम्ही सुरक्षित, पण कुटुंबियांना..'

प्रमोद सावंत

मालेगाव, (जि. नाशिक) : युक्रेनवर रशिया युद्धाचे ढग दाटले होते. रशिया तातडीने हल्ला करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अचानक सुरू झालेल्या या युद्धामुळे युक्रेनमध्ये स्फोटक वातावरण आहे.

या सगळ्यात, आमच्यासह बहुसंख्य भारतीय सुरक्षित आहेत. कुटुंबीयांना मात्र आमची मोठी चिंता आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सर्वांचे दूरध्वनी खणखणत आहेत. सध्या किव्ह (युक्रेन) मध्ये वीज व पाणीपुरवठा सुरळीत आहे. आगामी काही दिवसांत स्थिती कशी असेल, याचीच सर्वांना चिंता आहे. येथील आमचे हॉटेल मालक मनीष दवे (मूळ रा. सुरत) भारतीयांना सर्वोतोपरी मदत करीत आहेत, असे किव्हस्थित सागर चव्हाण (मूळ रा. नाशिक) याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सागर म्हणाला, की युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत. येथे मोठ्या संख्येने भारतीय रेस्टॉरंट आहेत. मी किव्हमधील साथिया रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी ‘वर्क परमिट’ व्हिसावर येथे आलो आहे. माझ्यासह अमेय दांडेकर, मयूर राऊत, शिवम कटोच असे गुजरात, मुंबई व नाशिक येथील १३ जण आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर आम्ही सर्वजण घर सोडून रेस्टॉरंटमध्ये बेसमेंटला एकाच ठिकाणी सुरक्षितस्थळी जमा झालो आहोत. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामकाजानिमित्त असलेल्या भारतीयांची संख्या २० हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. काही भारतीय पोलंडला जाण्याच्या तयारीत आहेत. तूर्त वातावरण बिघडलेले असल्याने बाहेर निघण्यास बंदी आहे. सर्व कामकाज ठप्प असून, दुकाने बंद आहेत. नाशिक येथील मित्र तेजस कोर याच्यासह कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलणे झाले. त्यांना चिंता करू नये, असे सांगितले.

विमानतळाच्या दिशेने गेलेले काही भारतीय रस्त्यात अडकले आहेत. त्यांना आपण मदत करू, असे दवे यांनी आम्हाला सांगितले. सध्या आम्ही सुरक्षितस्थळी असलो तरी सर्वांच्या कुटुंबीयांना मोठी काळजी आहे. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी सध्या आमची कुठलीही चर्चा नाही. तूर्त सर्वत्र गोंधळाचे वातावरण असल्याने युक्रेन सोडावयाचे की नाही, याचा निर्णय झालेला नाही. शहरात काही प्रमाणात सायरनसह विविध प्रकारचे आवाज कानी पडत आहेत. रशियाचे सैन्य २० मिनिट ते अर्धा तासाच्या अंतरावर आहे. यांसह वेगवेगळ्या चर्चांना व अफवांना उधान आले आहे. प्रामुख्याने युक्रेनमधील काही शहरातील सैन्यतळ व विमानतळांवर हल्ले झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT