NV Ramana Sakal
देश

'न्यायव्यवस्थेचं भारतीयकरण हवं': सरन्यायाधीश रमणा

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : देशातील न्यायव्यवस्थेचं भारतीयकरण होणं, ही काळाची गरज असून न्यायव्यवस्था ही सर्वांपर्यंत पोहोचणारी आणि प्रभावी असणं गरजेचं असल्याचं मत सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी मांडलंय. न्यायालयं ही प्रतिवादीकेंद्री असायला हवीत. न्यायदानाची प्रक्रिया देखील अधिक सुलभ होणं गरजेचं असून तीच खरी चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केलंय.

‘‘अनेकदा आपली न्यायव्यवस्थाच सर्वसामान्य माणसासमोर अनेक आव्हाने उभी करत असते. भारतातील काही जटीलता लक्षात घेतल्या तर न्यायालयांच्या कामकाजाची पद्धत ही आपल्याला अनुरूप अशी नाही. आपली न्यायव्यवस्था, वकिली व्यवसाय आणि कायदेशीर नियम हे वसाहतकालीन आहेत. भारतीय लोकांना त्याचा फारसा लाभ होताना दिसत नाही.’’ अशी खंत देखील रमणा यांनी व्यक्त केलीये. सर्वोच्च न्यायालयाचे दिवंगत न्यायाधीश मोहन. एम. शांतनागौडर यांना श्रद्धांजली अर्पण करताना सरन्यायाधीशांनी उपरोक्त मत मांडले. न्यायव्यवस्थेच्या भारतीयकरणात मला बऱ्याच गोष्टी अभिप्रेत आहेत असं सांगताना न्या. रमणा म्हणाले की, आपण समाजाशी संबंधित काही वास्तविक बाबींचा स्वीकार करायला हवा. न्यायव्यवस्था ही स्थानिककेंद्री असली पाहिजे. उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रामीण भागांतील पक्षकारांना आपले वाद हे न्यायालयाबाहेरच मिटावेत असे वाटत असते. बऱ्याचदा गावात राहणाऱ्या लोकांना इंग्रजीतील युक्तिवाद समजत नाही. अनेकदा न्याय मिळायला देखील बराच अवधी लागतो त्यामुळे याचिकाकर्त्यांसमोरील जटीलता आणखी वाढते.

आदेश समजून घेण्यासाठी खर्च

याचिकाकर्त्यांना न्यायालयाने आदेशांमध्ये नेमके काय म्हटले आहे, हे समजून घेण्यासाठी देखील पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे न्यायव्यवस्थेचं सुलभीकरण होणं फार गरजेचं आहे. न्यायदानाची व्यवस्था ही अधिक पारदर्शक, थेट लोकांपर्यंत पोचणारी आणि प्रभावी असणं गरजेचं आहे. दिवंगत न्या.शांतनागौडर यांच्याशी आपण दररोज या विषयावर चर्चा करत असू असंही न्या. रमणा यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT