Khalistan supporters attacked Indian journalist esakal
देश

Khalistani Movement : थेट मुख्यमंत्र्‍यांच्या मुलीला फोन करून खलिस्तान्यांनी दिली धमकी

हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई का केली जात नाही, असा सवाल खलिस्तान्यांनी विचारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची मुलगी सीरत कौर मान यांना खलिस्तानी समर्थकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप एका वकिलाने केला आहे. मुख्यमंत्री मान यांची पूर्वाश्रमीची पत्नी इंद्रप्रीत कौर ग्रेवाल यांनी वकील हरमीत बराड यांची एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भगवंत मान यांच्या मुलीला खलिस्तानी समर्थकांकडून अश्लाघ्य भाषेतले फोन करण्यात आले. असेच काही गट अमेरिकेत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलांना त्रास देण्याचं नियोजन करत आहेत. मुलांना घाबरवून, धमकावून, शिव्या देऊन तुम्हाला खलिस्तान मिळणार आहे का? असे लोक शीख धर्माच्या नावाला कलंक आहेत.

ही पोस्ट शेअऱ करताना मान यांच्या पूर्वपत्नी इंद्रप्रीत म्हणाल्या की, धन्यवाद, ही पोस्ट केल्याबद्दल आभार. इंद्रप्रीत यांनी हे आरोप खरे असल्याचंही म्हटलं आहे. इंद्रप्रीत कौर ग्रेवाल आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत रहत आहेत. त्यांचा आणि भगवंत मान यांचा घटस्फोट झाला आहे.

अकाल तख्त यांनी पंजाब सरकारला अल्टिमेटम दिला आहे. अमृतपाल सिंह आणि त्याच्या समर्थकांविरोधात झालेल्या कारवाईच्या विरोधात अकाल तख्तने भगवंत मान सरकार आणि केंद्राच्या विरोधात एक निवेदन जारी केलं आहे. हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई का केली जात नाही, असा सवाल या निवेदनातून विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT