Eknath shinde Amit Shah Sakal
देश

CM शिंदे-अमित शाहांमध्ये दिल्लीत 'रात्रीस बैठक चाले..?'

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यात मध्यरात्री बैठक झाल्याची माहिती आहे. मुंबईतील येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं सांगण्यात येत असून त्यांच्यात नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली ही माहिती समोर आली नाही.

(CM Eknath Shinde and Amit Shah Meeting Updates)

नवी दिल्लीत काल (बुधवारी) पार पडलेल्या राज्यप्रमुखांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल महाराष्ट्रासाठी रवाना होणार होते पण त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला आणि ते दिल्लीतच थांबल्याची माहिती आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र सदनातून २० मिनीटे बाहेर होते. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि त्यांच्यात बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि शिंदे गटाला आपलं म्हणणं मांडण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे ती मुदत जवळ येत असून सुप्रीम कोर्टातही या वादावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहा आणि शिंदे यांच्यातील भेट महत्त्वाची ठरू शकते.

दरम्यान, काल शिवसेनेच्या गटप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान फटकेबाजी केली असून शिंदे गटानेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी टाईट फिल्डींग लावल्याचं मेळाव्यावरून दिसून येत आहे. मुंबईत भाजप आणि अमित शाहांना मिटवून टाकू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT