CM Pinarayi Vijayan esakal
देश

केरळात वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार नाही : CM पिनाराई

सकाळ डिजिटल टीम

काही लोक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागात सर्वेक्षण करत आहेत.

तिरुवनंतपुरम : सरकार वादग्रस्त नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (Citizenship Amendment Act CAA) राज्यात लागू करणार नाही. नागरिकत्व कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असून ती कायम राहील. आपला देश संविधानावर चालतो, त्यामुळं आम्ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरच कार्य करु, असं स्पष्ट मत केरळचे (Kerala) मुख्यमंत्री पिनाराई विजयन (CM Pinarayi Vijayan) यांनी व्यक्त केलं. सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या समारोपात ते बोलत होते.

मुख्यमंत्री पिनाराई पुढं म्हणाले, काही लोक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागात सर्वेक्षण करत आहेत. पण, आमच्या सरकारनं समाजातील गरीब कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केलंय. आता त्यांच्या विकासासाठी पुढील पावलं उचलली जातील. गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कोरोना महामारी संपल्यानंतर हा कायदा लागू केला जाईल, असं सांगितलं होतं.

नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा काय आहे?

नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा केंद्र सरकारनं (Central Government) 2019 मध्ये संसदेत मंजूर केला. या विधेयकाचा उद्देश पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या सहा समुदायांच्या (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी) निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देणं हा आहे. या 6 समुदायांमध्ये मुस्लिम समाजाचा समावेश न केल्यानं अनेक राजकीय पक्ष विरोध करत आहेत. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी संसदेत हा दुरुस्ती कायदा मंजूर झाला, तेव्हा संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया आणि निषेध झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT