Cocaine Smuggling Case  esakal
देश

Cocaine Smuggling : नायजेरियन नागरिकाने गिळली तब्बल 20 कोटींची 99 कॅप्सूल्स; दोन किलो कोकेनची केली पोटातून तस्करी

तब्बल २० कोटींचे कोकेन त्याच्या पोटातून काढण्यासाठी त्याला पाच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

आदिस अबाबा येथून इथिओपियन एअरलाइन्सचे फ्लाइटने तो आला होता. तस्करीच्या महत्त्वपूर्ण ऑपरेशनबद्दल माहिती मिळाल्यावर तपासकर्त्यांनी त्या आफ्रिकन व्यक्तीला ताब्यात घेतले.

बंगळूर : बंगळूर विमानतळावर (Bangalore Airport) एक नायजेरियन नागरिक (Nigerian Citizen) पोटात तब्बल ९९ कॅप्सूलमधून दोन किलोग्राम कोकेनची तस्करी (Cocaine Smuggling) करत असताना त्याला पकडण्यात आले. तो आदिस अबाबा (इथियोपिया) येथून बंगळूरला आला होता. महसूलच्या गुप्तचर संचालनालयाने (DRI) विमानतळावर त्याला पकडले.

तब्बल २० कोटींचे कोकेन त्याच्या पोटातून काढण्यासाठी त्याला पाच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यानंतर ते कोकेन पोलिसांनी जप्त केले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्कर हा ४० वर्षीय नायजेरियन पासपोर्टधारक भारतात वैद्यकीय उपचार व्हिसावर आला आहे. ११ डिसेंबर २०२३ रोजी डीआरआयच्या बंगळूर युनिटने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अडवले.

आदिस अबाबा येथून इथिओपियन एअरलाइन्सचे फ्लाइटने तो आला होता. तस्करीच्या महत्त्वपूर्ण ऑपरेशनबद्दल माहिती मिळाल्यावर तपासकर्त्यांनी त्या आफ्रिकन व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने आदिस अबाबाच्या फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी कोकेन ९९ कॅप्सूल खाल्ल्याचे उघड झाले. त्याच्या अटकेसाठी न्यायालयीन आदेश प्राप्त झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

पाच दिवसांत त्याच्या शरीरातून सर्व कॅप्सूल यशस्वीरित्या काढण्यात आल्याची खात्री सूत्रांनी दिली. अखेरीस शुक्रवारी डीआरआय बंगळूर पथकाने अशा निष्कर्षापर्यंत आले की, संशयिताने दोन किलोग्रॅम वजनाच्या आणि सध्याचे आंतरराष्ट्रीय मूल्य २० कोटी असल्याचा अंदाज करण्यात आला. त्याने कोकेन असलेल्या एकूण ९९ कॅप्सूल गिळल्याचे स्पष्ट झाले. त्याला अंमलबजावणी एजन्सीने पकडले आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत त्याच्यावर आरोप लावले.

त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्याला बंगळूरमधील परप्पन अग्रहार कारागृहात ठेवण्यात आले. त्या आफ्रिकन व्यक्तीने बंगळूरमध्ये उतरल्यानंतर दिल्लीला जाणाऱ्या देशांतर्गत विमानात बसण्याचा विचार केला होता आणि कोकेन राजधानीतील हँडलर्सकडे सोपवण्याची योजना त्याने आखली होती. मात्र, बंगळूर विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्याचे मनसुबे उधळून लावले.

एकट्याची सर्वात मोठी तस्करी

११ डिसेंबर रोजी झालेल्या कोकेन तस्करीची ही मोठी घटना घडली आहे. एकट्या व्यक्तीने कोकेन किंवा अमली पदार्थांची तस्करी करण्याचा हा सर्वात मोठा प्रयत्न म्हणून त्याची नोंद झाली आहे. कारण सूत्रांनी पुष्टी केल्यानुसार त्याने ९९ कॅप्सूल गिळल्या होत्या. त्याचे संपूर्ण वजन हे दोन किलोग्राम होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT