baba rahim sakal
देश

निवडणुकीच्या काळात बाबा राहिमला मिळालेला पॅरोल हा योगायोग - ओमप्रकाश खट्टर

बाबा रहीमला हरियाणा सरकारने आज पॅरोल मंजूर केला

- मंगेश कोळपकर

चंदीगड: सच्चा डेराचा बाबा रहीमला मंजूर झालेला पॅरोल हा कायदेशीर असून निवडणुकीच्या काळात मिळाला असला तरी तो योगायोग आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री ओमप्रकाश खट्टर यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी केले.

बाबा रहीमला हरियाणा सरकारने आज पॅरोल मंजूर केला. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी चरणजीत सजनी यांचं नाव रविवारी जाहीर केलं त्यामुळे पंजाबमध्ये जातीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल झाला आहे या पार्श्वभूमीवर दलित समाजामध्ये लक्षणीय पाठबळ असलेल्या बाबा रहीम मला हरियाणा सरकारने आज तातडीने पॅरोल मंजूर केला.

या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा केली असता, खट्टर म्हणाले, "कोणत्याही कैद्याने तीन वर्षे कैद पूर्ण केल्यानंतर तो पॅरोलसाठी पात्र ठरतो. त्यानुसार बाबा रहिमला पॅरोल मिळाला आहे. त्यामध्ये राज्य सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही."

मतदानापूर्वी 12 दिवस अगोदर पॅरोल कसा मंजूर झाला, असे त्यांना विचारले असता निवडणुकीच्या काळातील हा तर एक केवळ योगायोग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंजाबमध्ये 32 टक्के दलित मते आहेत. पंजाबच्या ग्रामीण भागात विशेषतः दलित समाजात राम राहिमचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत. काँग्रेसने खेळलेले दलित कार्ड पुसून काढण्यासाठी बाबा राहिमसाठी भाजपने पॅरोलची खेळी खेळली आहे, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT