देश

जवानाच्या गोळीबारात सहकारी मृत्युमुखी 

पीटीआय

कोलकता : लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने केलेल्या बेछूट गोळीबारात त्याचा एक सहकारी ठार झाला, तर काही जवान जखमी झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बागनान या तळावर ही घटना घडली. रजा नाकारल्याने आलेल्या तणावातून या जवानाने हे कृत्य केल्याचे कळते. 

निवडणूक सुरक्षेच्या कर्तव्यावर असलेल्या जवानांचा तळ ज्योतिर्मय गर्ल्स हायस्कूल या शाळेत आहे. तेथे लक्ष्मीकांत बर्मन या जवानाने केलेल्या बेछूट गोळीबारात त्याचा सहकारी भोलानाथ दास हा ठार झाला. बर्मनने तब्बल 18 गोळ्या झाडल्या. या गोळीबारात काही जवान जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची नावे अनिल राजवंशी आणि रांतू मणी अशी आहेत.

बर्मन याला रजा नाकारण्यात आल्यामुळे तो तणावात होता. त्यात तो आक्रमक होऊन सहकाऱ्यांना धमक्‍या देऊ लागल्यामुळे त्याला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून निसटून त्याने सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. नंतर अन्य जवानांनी त्याला पकडले. या घटनेचा अहवाल देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने हावड्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT