Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

Viral Video: काही माकडे स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहेत. यानंतर, आणखी काही माकडे तलावाबाहेर स्वत:ला सुकवताना दिसतात.
Monkeys have fun in the swimming pool to escape the Mumbai heat video viral
Monkeys have fun in the swimming pool to escape the Mumbai heat video viralesakal

Viral Video:

संपूर्ण भारतात तापमान वाढत असताना अनेकजण एसी आणि कुलरचा सहारा घेतात. परंतु प्राण्यांचं काय?... तर एका निवासी संकुलातील  स्विमिंगपूलमध्ये माकडांच्या कळपाने पोहण्याचा चांगलाच आनंद घेतला.  सहा ते सात माकडांचा समूह मुंबईच्या बोरिवली परिसरातील एका निवासी संकुलातील स्विमिंगपूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहेत. या माकडांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. 'जंगलाने आपली जमीन पुन्हा मिळवली' याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून नाव दिले, तर इतरांनी त्यांच्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई मार्च नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहीला आहे. त्यामुळे अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत.

Monkeys have fun in the swimming pool to escape the Mumbai heat video viral
Solar Energy Generation : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

एका वापरकर्त्याने लिहिले...प्राण्यांनाही पूलमध्ये थंड होण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले...आज ते पोहत आहे आणि उद्यापासून इतर काही पद्धती अवलंबणार आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले... ही माकडे उन्हाळ्याची खरी मजा घेत आहेत आणि तेही मोफत.

Monkeys have fun in the swimming pool to escape the Mumbai heat video viral
Virar-Bolij : विरार बोळींजची घरे मिळणार आधार-पॅन कार्डावर; लॉटरीचे नो टेन्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com