कर्नल विजय रावत Sakal
देश

केवळ जनतेची सेवा करण्यामध्ये रस : कर्नल विजय रावत

दिवंगत सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांचे लहान भाऊ कर्नल विजय रावत यांनी आपण उत्तराखंडमधील आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

डेहराडून : दिवंगत सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांचे लहान भाऊ कर्नल विजय रावत यांनी आपण उत्तराखंडमधील आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. ते नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याच्या चर्चेने जोर पकडला होता. भाजपने उमेदवारीसाठी आग्रह केल्यास आपण नम्रपणे नकार देण्याची ९९ टक्के शक्यता आहे. असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, आपल्याला केवळ मुक्तपणे जनतेची सेवा करण्यात रस आहे. कोणत्याही पदाची इच्छा नाही. लष्करातील ३४ वर्षांच्या सेवेत माझी वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. स्वतःच्याच राज्याच्या जनतेची सेवा करता आली नाही. आता निवृत्त झालो असल्यामुळे हे करू शकेन. पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यापासून विजय रावत जयपूरमध्ये राहात आहेत. उत्तराखंडमधील पर्यटनाच्या क्षमतेचा स्थानिकांना घरापाशी रोजगार देण्यासाठी वापर करता येईल. त्यामुळे पहाडी भागातून होणारे स्थलांतर थांबविता येईल. योगा ट्रेकिंग आणि इतर साहसी खेळांमुळे स्थानिकांना स्वयंरोजगाराज्या संधी उपलब्ध आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले.

शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे सुट्टीसाठी प्रदूषण नसलेल्या पहाडी भागात येण्याचे आणि तेथे राहण्याचे प्रमाण वाढते आहे. उत्तराखंड सरकारने होमस्टे योजना सुरु केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकेल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

माझे मोठे बंधू बिपिन यांची उत्तराखंडमध्ये राजकारणाच्या पलीकडे लोकांची सेवा करण्याची फार इच्छा होती. अल्मोडा, रानीखेत यांसह विविध भागांसाठी त्यांच्याकडे विशिष्ट विकास योजना होत्या. मला त्यांच्याबद्दल आणखी बोलणे शक्य होणार नाही, कारण त्यांच्या आठवणीने मला दुःख होते.

- निवृत्त कर्नल विजय रावत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT