election exit  
देश

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

काँग्रेसच्या माध्यमे व प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर उद्या, शनिवारी होणाऱ्या मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झीट पोल) अनुमानावर होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत. या संदर्भात काँग्रेसच्या माध्यमे व प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Congress Boycott Exit Polls why did Congress take this decision)

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल दाखविले जाणार आहेत. पवन खेडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदारांनी मत दिलेले आहेत. ईव्हीएममध्ये मतदारांचा कौल बंद झालेला आहे. येत्या चार जूनला मतदारांचा कौल सर्वांपुढे येणारच आहे. केवळ टीआरपी वाढविण्यासाठी होणाऱ्या या निरर्थक चर्चांच्या खेळात सहभागी होण्याचे कोणतेही औचित्य नसल्याची भूमिका काँग्रेसची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही चर्चेचा उद्देश हा दर्शकांचे ज्ञानवर्धन करण्याचा असतो. या चर्चांमध्ये तसे काहीही होत नाही, मात्र येत्या चार जून रोजी निकालाच्या दिवशी काँग्रेसचे प्रतिनिधी होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होतील, असेही पवन खेडा यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

SCROLL FOR NEXT