PM Modi  Sakal
देश

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या मौनव्रताविरुद्ध काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

‘निवडणूक प्रचार संपल्यानंतरच्या शांततेच्या काळात पंतप्रधानांचे हे मौनव्रत अप्रत्यक्ष प्रचार ठरू शकतो.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथे विवेकानंद स्मृतिस्थळी मौनव्रत पालन करण्याची घोषणा केली आहे. या मौनव्रताविरुद्ध काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

‘निवडणूक प्रचार संपल्यानंतरच्या शांततेच्या काळात पंतप्रधानांचे हे मौनव्रत अप्रत्यक्ष प्रचार ठरू शकतो. त्यामुळे मौनव्रताच्या माध्यमांमधून प्रसारण होण्यावर बंदी घालावी,’ अशी मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेऊन तक्रारवजा निवेदन सादर केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंघवी म्हणाले, ‘‘प्रचार संपल्यानंतरच्या ४८ तासांच्या शांततेच्या कालावधीत, कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची परवानगी देऊ नये.

मोदींच्या मौनव्रताला काहीही आक्षेप नाही. कोणताही नेता मौनव्रत पाळू शकतो. मात्र शांततेच्या काळातील अप्रत्यक्ष प्रचार ठरू नये. उद्या (ता. ३०) सायंकाळपासून मौनव्रताला बसण्याची मोदींनी घोषणा केली आहे. ३० जून ते १ जूनपर्यंत मौन कालावधी असेल.

त्यांचे हे मौनव्रत आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे मतदान संपल्यानंतर एक जूनच्या सायंकाळी त्यांनी मौनव्रत सुरू करावे.’’ उद्याच मौनव्रत सुरू करण्याचा पंतप्रधानांचा आग्रह असेल तर मुद्रित व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण होणे आयोगाने रोखावे, अशीही मागणी सिंघवी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT