Congress
Congress 
देश

Loksabha 2019 : दिल्लीत काँग्रेस अखेर स्वबळावर 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्षाबरोबर (आप) आघाडीच्या सर्व शक्‍यता मावळल्यानंतर कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे दिल्लीत "भाजप विरुद्ध कॉंग्रेस विरुद्ध आप' अशी तिरंगी लढत सातही मतदारसंघांमध्ये असेल. हरियानामध्ये माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनाही लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.

कॉंग्रेसने आज दिल्लीतील सात जागांपैकी सहा जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामुळे "आप'शी आघाडीच्या शक्‍यतांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कॉंग्रेसने शीला दीक्षित यांना ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दिली आहे, तर अजय माकन यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवार बनविले आहे. पूर्व दिल्लीमधून अरविंदसिंग लवली, वायव्य दिल्लीतून राजेश लिलोथिया आणि पश्‍चिम दिल्लीतून महाबळ मिश्रा उमेदवार आहेत. चांदनी चौक मतदारसंघातून माजी प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघातून लढण्यास माजी कायदामंत्री व राज्यसभा खासदार कपिल सिब्बल इच्छुक होते. दक्षिण दिल्ली मतदारसंघातील नावाची अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु, ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याला येथून उमेदवारी मिळण्याची जोरदार शक्‍यता आहे. 

हरियानात पिता-पुत्राला उमेदवारी 
हरियानात कॉंग्रेसने शिल्लक चार उमेदवारांची घोषणा काल केली. फरिदाबादमधील उमेदवार बदलण्यात आला आहे. कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांना सोनिपतमधून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचे पुत्र व विद्यमान खासदार दीपेंद्र हुडा यांना आधीच रोहतकमधून उमेदवारी मिळाली असल्याने पित्रा-पुत्र एकाचवेळी मतदारांना सामोरे जातील. याव्यतिरिक्त कुरुक्षेत्रमधून निर्मल सिंह, कर्नालमधून कुलदीप शर्मा यांना, तर हिस्सारमधून भव्य बिश्‍नोई यांना उमेदवारी मिळाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT