Congress party Rahul Gandhi and Sonia Gandhi Sakal
देश

Congress Files : पेंटिंगच्या नावे पैसे अन् पद्मभूषण देण्याची ऑफर; भाजपचे पुन्हा गंभीर आरोप

रोहित कणसे

भारतीय जनता पक्षाने सोमवारी काँग्रेस शासनकाळात झालेल्या कथित घोटाळ्यांवर आधारित काँग्रेस फाइल्सचा दुसरा एपिसोड आज (३ एप्रिल) रोजी लाँच केला आहे. या एपिसोडमध्ये यश बँकेचे तात्कालिन चेअरमन राणा कपूर यांच्यावर दबाव टाकून त्यांना दोन कोटी रुपयांची पेंटींग विकत घेण्यास भाग पाडल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

मागच्या काही दिवसांपासून हिंडनबर्ग-अदाणी या मुद्द्यावर काँग्रेसकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. यानंतर आता भाजपकडून देखील काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

काँग्रेस फाइल्स च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये भाजपने काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

एफएटीएफ रिपोर्टचा संदर्भ देत भाजपने म्हटले की, आतापर्यंत एफएटीएफ अहवालात पाकिस्तानसारख्या देशांचा केस स्टडीज असायचा जे दहशतवादाला आर्थिक मदत करत होते, आज त्यात गांधी कुटुंबाच्या भ्रष्टाचाराची केस स्टडी केले जात आहेत.

यस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी कपूरने ईडीसमोर खुलासा केला की, प्रियांका गांधींकडून त्यांना एमएफ हुसैन यांची पेंटिंग विकत घेण्यास भाग पाडले होते. या पेंटिंगची किंमत दोन कोटी रुपये होती. हे रुपये सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरले गेले.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, राणा कपूर यांनी असेही म्हटले आहे की, तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनीही राणा कपूर यांना सांगितले होते की, जर त्यांनी पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिला तर त्यांचे गांधी कुटुंबाशी असलेले संबंध बिघडतील.

ईडीच्या आरोपपत्रात राणा कपूर यांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी प्रियांका गांधी यांना चेकद्वारे २ कोटी रुपये दिले. १ मे २०१० रोजी, मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा याने राणा कपूर यांना एक पत्र लिहिले, ज्याद्वारे राणा कपूरवर प्रियांका गांधी यांना पेंटिंग विकत घेण्यासाठी पत्र लिहिण्यासाठी दबाव टाकण्यात आला. याशिवाय आणखीही अनेक मेसेज पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये मिलिंद देवरा हे पेंटिंग विकत घेण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे भाजपने म्हटले आहे.

भाजपने म्हटले आहे की, इतकेच नाही तर या पेंटींगच्या नावावर पैसे जमा करण्याच्या बदल्यात गांधी कुटुंबाच्या वतीने अहमद पटेल यांनी पद्मभूषण देण्याची ऑफर देखील देण्यात आली होती. हा लाजिरवाणा प्रकार आहे. काँग्रेसने किती राष्ट्रीय सन्मान पैशात मोजले आहेत, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस देऊ शकेल का? याचे उत्तर काँग्रेसकडे नाही. काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांचे इतके किस्से आहेत की काँग्रेसकडे त्याचा हिशोब नाही, असेही भाजपने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT