rahul gandhi file photo
देश

'काँग्रेस म्हणजे सर्कस! राहुल गांधी कोणीही नाहीत, तरी मुख्यमंत्र्यांना हटवतात'

सकाळ डिजिटल टीम

शिवराज सिंह यांनी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील काँग्रेसच्या अवस्थेवरून टीका केली आहे. हा अध्यक्ष नसलेला पक्ष असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जी २३ नेत्यांना मीच पूर्ण वेळ अध्यक्ष असल्याचं सांगत ठणकावले. याशिवाय लवकरच अध्यक्षपदासाठी निवडणूकीची प्रक्रिया होईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेसवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था सर्कससारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं.

शिवराज सिंह यांनी खंडवा मतदरासंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. हा पक्ष असा आहे ज्यांचा कोणी अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या कार्यकारी अध्यक्ष आहेत. एक जी २३ ग्रुप वेगळा आहे. राहुल गांधी कोणीच नाहीत, तरीही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा निर्णय़ घेतात. हे सगळं सर्कस सारखं झालं असल्याचा टोला शिवराज सिंह चौहान यांनी लगावला.

जगात आतापर्यंत असं कधी पाहिलं नसेल. पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावरून कॅप्टन यांना हटवून चन्नींना बसवलं आहे. तर सिद्धू त्या लोकांपैकी आहेत जे आम्ही बुडणार आणि तुम्हालाही घेऊन बुडणार म्हणतात. असंच छत्तीसगढमध्येही फिफ्टी फिफ्टी सुरु आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस कमलनाथ यांच्यापुरतीच मर्यादीत असल्याचंही शिवराज सिंह चौहान म्हणाले.

मध्य प्रदेशात याआधी १५ महिन्यांच्या कमलनाथ सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली. त्यांच्या कार्यकाळात सर्व विकास कामे ठप्प झाली होती. भाजपच्या जुन्या सर्व कल्याणकारी योजना बंद केल्या होत्या. फक्त टक्केवारीचा खेळ सुरु होता. गरीबांसाठी असलेली संबल सारखी योजना बंद केली होती. पुन्हा भाजप सरकार आले तेव्हा कोरोनाचं संकट असतानाही विकासकामे सुरु केल्याचं शिवराज सिंह यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT