Petition To Postpone Five States Assembly polls e sakal
देश

पाच राज्यांच्या निवडणुका पुढे ढकला, दिल्ली हायकोर्टात याचिका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातच पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पण, या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेस नेत्यानं केली आहे. याबाबत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

जगदीश शर्मा हे काँग्रेसचे नेते आहेत. देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे पाचही राज्यातील विधानसभा निवडणुका काही आठवडे किंवा काही महिने पुढे ढकलण्यात याव्या. याबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे, अशी विनंती शर्मा यांनी याचिकेतून केली आहे.

गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यानिमित्त प्रचारासाठी राजकीय पक्षाचे नेते या राज्यात जातात. त्यांना दिल्लीत येताना १४ दिवस किंवा त्यापेक्षा कमी विलगीकरणाचा कालावधी ठेवण्याचे निर्देश दिल्ली सरकारला जारी करावेत, असंही या याचिकेत म्हटलं आहे. इतकेच नाहीतर त्यांनी कोरोनाच्या काळात देशातील अपुऱ्या सोयी-सुविधांकडे देखील लक्ष वेधलं आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची गौरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सेवांचा योग्य पुरवठा झाला पाहिजे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांना नियोजन करण्याचे निर्देशही न्यायालयानं द्यावे, अशी विनंती देखील त्यांनी केली.

दरम्यान, उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून ७ मार्चला संपणार आहेत. १० मार्चला निकाल लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT