harish rawat 
देश

'निवडणूक लढण्यास पैसा नाही, पण उत्तराखंडचा CM व्हायला तयार'

काँग्रेस नेते हरिश रावतांची इच्छा...

सकाळ डिजिटल टीम

देहराडून : आगामी २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत पक्ष जर सत्तेत आला, तर मला शासनप्रमुख म्हणून काम करायला आवडेल, असे सूचक मत काँग्रेस नेते तथा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत (Congress Leader Harish Rawat) यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच 'द प्रिंट' या संकेतस्थळाला रावत यांनी मुलाखत दिली. विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे रावत म्हणाले. निवडणुकीसाठी पैसा नसल्याचे त्यांनी सांगितले. रावत हे ऑक्टोबरपर्यंत काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढल्याचे त्यांनी समर्थन केले. सिंग हे भाजप-अकाली दलाचे एजंट म्हणून काम करत होते असा आरोप रावत यांनी केले आहे. उत्तराखंडातील आगामी निवडणुकीवर (Uttarakhan Assembly Election) बोलताना हरिश रावत यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर भाष्य करण्यास नकार दिला. जर उत्तराखंडच्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मत दिल्यास मी शासनप्रमुख म्हणून जबाबदारी घ्यायला मागे हटणार नाही आणि तसे पक्षालाही अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी मी केदारनाथ मंदिराला भेट दिली. एकाने मला विचारले की देवाकडे तुम्ही काय प्रार्थना केली. मी काही म्हटलो नाही. पण माझी प्रतिक्रिया अशी, मी देवाकडे मागणी केली की मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT