Gandhi_Modi 
देश

बचत केलेल्या पैशांचं करणार काय? राहुल गांधींचा केंद्र सरकारला टोला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे देशभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे दर कमी झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे मोदी सरकारवर नेहमीच टीका करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर १७-१८ पैसे कमी केल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे. राहुल गांधींचं हे ट्विट सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. 

राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सध्या देशभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. १७-१८ पैशांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे बचत केलेल्या या रकमेचे तुम्ही काय कराल? या ट्विटच्या तळाशी #FuelLutByBJP हा हॅशटॅग ही त्यांनी वापरला आहे. 

दरम्यान, रविवारी देशातील प्रमुख चार मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९०.७८ रुपये, तर डिझेलची किंमत ८१.१० रुपये प्रतिलिटर आहे. मेट्रो शहरांपैकी मुंबईत अजूनही पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल ९७.१९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.२० रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT