Rahul Gandhi  esakal
देश

Rahul Gandhi : परराष्ट्र दौऱ्याने राहुल यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला ब्रेक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परराष्ट्र दौरा आणि पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकांमुळे नेतृत्वातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला काही दिवस विश्रांती मिळणार आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परराष्ट्र दौरा आणि पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकांमुळे नेतृत्वातील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला काही दिवस विश्रांती मिळणार आहे. उद्या, गुरुवार आणि शुक्रवारी न्याय यात्रा स्थगित राहणार आहे. त्याचप्रमाणे येत्या २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत न्याय यात्रा राहणार नसल्याचे काँग्रेसकडून आज स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या १४ जानेवारीपासून सुरू झालेली ही न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई जाणार आहे. आतापर्यंत मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड राज्यातून ही यात्रा उत्तर प्रदेशात पोचली आहे.

उत्तरप्रदेशातील अमेठी व रायबरेली या दोन प्रमुख जिल्ह्यातून ही यात्रा पश्चिम उत्तरप्रदेश जेथे मुस्लिम बहुल मतदार आहेत. त्या ठिकाणी पोचली आहे. न्याय यात्रा २२ व २३ फेब्रुवारीला पुढे जाणार नाही. न्याय यात्रा २४ फेब्रुवारीपासून पुन्हा मुरादाबाद येथून सुरू होईल.

केब्रिंज विद्यापीठात भाषण

भारत जोडो न्याय यात्रा संभल, अलिगड, हाथरस आणि आग्रा येथे आल्यानंतर पुन्हा २६ फेब्रुवारीपासून ही यात्रा याच ठिकाणी स्थगित राहिल. २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत राहुल गांधी केब्रिंज विद्यापीठात भाषण देण्यासाठी जाणार असल्याने ही यात्रा स्थगित केली आहे.

तसेच याच काळात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दिल्लीतही काँग्रेसच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर २ मार्चपासून पूर्ववतपणे ही यात्रा धौलपूर येथून सुरू होणार असल्याचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT