congress Rahul Gandhi News Sakal
देश

Rahul Gandhi: मणिपूरमधला तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही.. राहुल गांधींनी सांगितली आठवण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सभागृहात बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पलटवार केलाय. राहुल म्हणाले की, 'मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. लहान मुलांना देखील मारलं जातंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हसत होते.त्यांनी अशी चेष्ठा करायला नको होती. विषय काँग्रेस नव्हता, मी नव्हतो. मणिपूर विषय आहे. पण, मणिपूरवर गांभीर्याने काहीही बोलण्यात आलं नाही.' (congress leader Rahul Gandhi criticize Narendra modi over manipur violence)

मी माझा एक अनुभव सांगतो. मी १९ वर्षांपासून राजकारणात आहे. मी प्रत्येक राज्यात गेलो आहे. मी जे मणिपूरमध्ये पाहिलंय ते पूर्वी पाहिलेलं नाही. त्यामुळेच मी म्हणतोय की मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झालीये. मी मणिपूर दौऱ्यावर गेलो होते. जेव्हा आम्ही मैतेई भागात गेलो तेव्हा आम्हाला स्पष्ट सांगण्यात आलं की तुमच्या सुरक्षेमध्ये कुकी कर्मचारी असेल तर त्याला इथे आणू नका नाहीतर आम्ही त्याला मारुन टाकू आणि जेव्हा आम्ही कुकी भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्या सुरक्षेमध्ये मैतेई असल्यास आम्ही त्याला मारुन टाकू. त्यामुळे आम्हाला मेटे आणि कुकी यांना वेगळे करावं लागलं. त्यामुळे मी म्हणतो की एक राज्य राहिलेलं नाही, दोन तुकडे झाले आहेत. भारताची हत्या मणिपूरमध्ये झाली आहे, असं गांधी म्हणाले.

सभागृहात जेव्हा मी पंतप्रधान मोदी यांना हसताना पाहिलं तेव्हा दु:ख वाटलं. देशाच्या पंतप्रधानांना काहीच गांभीर्य नाही. देशात काय चाललंय हे त्यांना माहिती नाही. त्यांना मणिपूरमध्ये जाण्याची इच्छा नसेल. पण, त्यांनी मणिपूरबाबत किमान बोलावं तरी. मला माहितेय आपले लष्कर दोन दिवसात हा हिंसाचार थांबतील. पण, त्यांना हे थांबवायचं नाही, त्यांना मणिपूर पेटवतं ठेवायचं आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT