Congress Leader Siddaramaiah
Congress Leader Siddaramaiah Google
देश

शाळेत भगवद् गीता शिकवायला आमचा विरोध नाही : काँग्रेस नेते

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटकातील हिजाब वादानंतर शाळेत मूल्यशिक्षण (Moral Science) शिकविणार असून यामध्ये भगवद् गीता, रामायण किंवा महाभारत यापैकी कोणत्याही एका विषयाचा समावेश असेल असं कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी. सी नागेश (Karnataka Education Minister B. C. Nagesh) म्हणाले होते. त्यावर आता कर्नाटक काँग्रेसचे मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Congress Leader Siddaramaiah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भगवद् गीता शिकविली तरी आम्हाला आक्षेप नाही, असं ते म्हणाले.

आम्ही मूल्यशिक्षणाला विरोध करत नाही. आमचा संविधान आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. ते भगवद्गीता, कुराण किंवा बायबल शिकवले, तरी आमचा काही आक्षेप नाही. भगवद् गीता शिकवण्याबाबत कर्नाटक सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सिद्धरमय्या म्हणाले.

कर्नाटकचे मंत्री काय म्हणाले होते? -

मूल्यशिक्षण सुरू करण्यासाठी आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. त्यांच्यासोबत सल्लामसलत करून पुढील शैक्षणिक सत्रापासून शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचा समावेश करण्याबाबत विचार करू. मूल्यशिक्षणामध्ये कोणते विषय असतील हे शिणतज्ज्ञांसोबत बोलून ठरवू. त्यामध्ये भगवद् गीता, रामायण आणि महाभारत देखील असू शकते. भगवद्‌गीता फक्त हिंदू नव्हे तर सर्वांसाठी बंधनकारक असेल. शिक्षणतज्ज्ञांनी होकार दिल्यास आम्ही पुढच्या सत्रापासून नक्की मूल्यशिक्षण सुरू करू, असं बी. सी. नागेश म्हणाले.

गुजरात सरकारनेही घेतला निर्णय -

गुजरातमध्ये बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीता शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर काही जणांनी टीका देखील केली आहे, तरी काहींनी स्वागत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT