Imran masood
Imran masood 
देश

Loksabha 2019 : मोदींचे तुकडे-तुकडे करु धमकी देणाऱ्याला काँग्रेसची उमेदवारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने काल (ता.08) उत्तर प्रदेश (यूपी) आणि गुजरात या दोन राज्यांसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एक नाव असे आहे की ज्यांनी नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करू अशी धमकी दिली होती.

काँग्रेसचे इम्रान मसूद यांचं नाव या पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आले असून, उत्तरप्रदेशातील सहारनपुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. 2014मध्ये इम्रान मसूद यांनी नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'मोदींचें तुकडे करू' असं त्यांनी म्हटले होते. मार्च 2014 च्या निवडणुकांमध्ये इम्रान मसूद यांनी अनेक वादग्रस्त वक्यव्य केली होती त्यासाठी ते जेलमध्येही गेले होते.

दरम्यान, 2014च्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेत इम्रान मसूद फक्त 1000 मतांनी हरले होते. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. इम्रान मसूद यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसला वारंवार झटका बसूनही त्यांना सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT