देश

Video : काँग्रेस आमदाराकडून भाजप कार्यकर्त्यांना धमकी; म्हणाले...

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार विजय चौरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विजय चौरे हे सौसर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. त्यांनी छिंदवाडातील सभेत बोलताना हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केल्यास चामडी सोलून काढण्यासही मागे पुढे पाहणार नाही. 

भाजप नेते परिस्थिती बिघडवत आहेत

राज्यातील भाजप नेते परिस्थिती बिघडवण्याचा काम करत आहेत, असा आरोप चौरे यांनी केला. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर चामडी सोलून काढू, अशी थेट आणि स्पष्ट धमकी त्यांनी भाजपला दिली.

आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार

आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत. काँग्रेसची मंडळी आम्ही आहोत. कोणत्याही अवैध, अनैतिक कामांमध्ये आमचा सहभाग नाही. अवैध कामं तुम्ही करता आणि बदनाम मात्र काँग्रेसच्या मंडळींना करता, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT