देश

तालिबानींमध्ये भारतीय देखील? शशी थरुरांचं ट्विट चर्चेत

विनायक होगाडे

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबान्यांची दमनकारी सत्ता स्थापन झाली आहे. काबुलसोबतच इतर शहरांमध्ये देखील तालिबान्यांचं वर्चस्व दिसून येत आहे. तालिबानी गाड्या थांबवून प्रत्येकाचा तपास करत आहेत. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशत माजवणाऱ्या तालिबान्यांसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. शशी थरुर यांनी म्हटलंय की, दहशत माजवणाऱ्या तालिबान्यांमध्ये दोन भारतीय देखील सामील आहेत. शशी थरुर यांनी म्हटलंय की, या दोन व्यक्ती मल्याळम भाषा बोलत आहेत.

तिरुवनंतपूरम मतदारसंघातून खासदार असणाऱ्या शशी थरुर यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमधील व्हिडीओत दोन व्यक्तींच्या हातात बंदूक आहेत आणि ते मल्याळम भाषा बोलत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत शशी थरुर यांनी लिहलंय, यांना ऐकून असं वाटतंय की, तिथे दोन मल्याळम तालिबानी देखील आहेत. यातील एकाने ८ सेकंदांपर्यंत मल्याळम भाषा बोलली आणि दुसरा त्याला ऐकत आहे. या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतंय की, काबूल शहराच्या बाहेरच्या परिसरात पोहोचल्यानंतर एक तालिबानी आनंदाने रस्त्यावर बसून रडायला लागला आहे. तर दुसरा व्यक्ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT